Breaking News

निळावंतीची देवाच्या गावातूनच का सुरूवात ?

 निळावंतीची देवाच्या गावातूनच का सुरूवात ?

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून धुलीवंदनाच्या मुहूर्तावर भाऊसाहेब इरोळे लिखित दिग्दर्शित अश्वयुग फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरवर बनत असलेल्या बहुचर्चित पण जनतेच्या मनात एक रहस्य बनून राहिलेल्या विषयावर "निळावंती एक रहस्य" या चित्रपटाच्या नावाची आज आळंदी देवाची येथून घोषणा झाली. 

 निळावंती एक रहस्य या चित्रपटाचे काम सुरु होत असल्याचे समजताच काही लोकांनी आळंदी देवाची हे पावन तीर्थंभूमी असल्याने या चित्रपटाची सुरुवात आळंदीमधून व्हावी. म्हणून वारकरी संप्रदायाचे प्रचारक / प्रसारक ,जगाला सुख शांतीचा संदेश देणाऱ्या आळंदी देवाची येथील ह.भ.प वाणीभूषण चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प अविनाश महाराज साळुंके, ह.भ.प केशव महाराज काकडे, ह.भ.प संजय महाराज केंद्रे, ह.भ.प गणेश महाराज जगताप , ह.भ.प प्रकाश महाराज खतोडे, ह.भ.प युवा कीर्तनकार गणेश महाराज घोडके, ओम महाराज चौधरी अश्या अनेक महाराज मंडळींच्या शुभहस्ते ' निळावंती एक रहस्य ' या चित्रपटाच्या नावाची घोषणा आळंदीत करण्यात आली. 

या कार्यक्रम प्रसंगी पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेशजी लंके यांच्या सुविद्य पत्नी जि.प .सदस्या सौ.राणीताई लंके यांच्या सह विनायक ठाकरे, नवनाथ फरगडे, अश्विनी इरोळे, प्रदीप टोणगे, मंगेश शेंडगे, रविंद्र वाव्हळ, सचिन सोनावणे, राणी टोणगे, सोनिया चौधरी, देवयानी वाळके, साई चौधरी, सुरेखा पोटघन, शीतल साबळे, रोहिणी वाळके, प्रशांत चौधरी,भरत घावटे, हर्षद बुध्दिवंत, विजय नलावडे, अमोल डुकरे, नित्या तळप,प्रमोद खटके, जय तिरखुंडे अश्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण लोंढे यांनी केले तर आभार अश्विनी इरोळे यांनी मानले.

 या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊसाहेब इरोळे हे करत असून त्यांचे गेल्या काही दिवसापासून पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या जीवनावर आधारित आखाडा या बायोपिक चित्रपटाचे काम सुरु आहे. आणि त्याच बरोबर ' निळावंती एक रहस्य ' याही चित्रपटावर त्यांचे काम सुरु होते. या चित्रपटाचे गाणे रेकॉर्डिंग पूर्ण झाले असून या चित्रपटात अनेक दिग्गज कलावंताचे काम असणार आहे. असे चित्रपटाच्या टीम कडून समजले जाते. 

 खूप वर्षांपासून अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे. कोण आहे निळावंती ? काय आहे निळावंती ग्रंथ ?. निळावंती सत्य कथा आहे कि दंत कथा आणि मग हा चित्रपट सुद्धा त्याच निळावंती आणि त्यावर भाष्य करणाऱ्या समाजावर तर अवलंबून नसेल ना ? अनेक स्वयंघोषित लेखकांनी सोशल मीडियाच्या मार्फत लोकांना निळावंती बद्दल अजून भ्रमित केलं जातंय, या लोकांनी त्यांच्या व्हिडीओ मधून, लेखणीमधून कोणी निळावंतीला राणी केलंय,कोणी देवी, कोणी ऋषिकन्या, कोणी भूतनी तर कोणी यक्षणी आणि या अश्या गोष्टीमुळे तर लोकांचा त्या रहस्यातून उलगडा होण्या ऐवजी गुंताच जास्त व्हायला लागलाय. आता काय माहिती नेमकं काय असेल या निळावंती एक रहस्य या चित्रपटात असा तर आता सर्रास लोक्कांना प्रश्नच पडलाय आणि त्या मुळे निळावंती एक रहस्य या चित्रपटाची सर्वांनाच आतुरता लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत